Special Report: एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेच… दिपक केसरकर यांचे खळबळजनक गौप्यस्फोट

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्यानंही उद्धव ठाकरे नाराज झाले होते..तसंच सुशांत सिंह प्रकरणावरुन राणेंनी आदित्य ठाकरेंवर जे गंभीर आरोप केले होते, त्याची तक्रारही मोदींकडे करण्यात आली होती, असा दावाही केसरकरांचा आहे.

Special Report: एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेच... दिपक केसरकर यांचे खळबळजनक गौप्यस्फोट
| Updated on: Aug 05, 2022 | 11:10 PM

मुंबई : शिंदे गटाचे आमदार, दिपक केसरकरांनी(Deepak Kesarkar) मोठा गौप्यस्फोट केला आहे.  गेल्या वर्षी उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना(PM Modi) भेटले आणि त्या भेटीनंतर 15 दिवसांत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) राजीनामा देणार होते. युतीसाठी बोलणीही झाली होती, असा दावा केसरकरांनी केला आहे.
मोदींना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते. मात्र त्याचवेळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं. त्यामुळं पुढची बोलणी फिस्कटली, असा गौप्यस्फोटही केसरकरांनी केला आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्यानंही उद्धव ठाकरे नाराज झाले होते..तसंच सुशांत सिंह प्रकरणावरुन राणेंनी आदित्य ठाकरेंवर जे गंभीर आरोप केले होते, त्याची तक्रारही मोदींकडे करण्यात आली होती, असा दावाही केसरकरांचा आहे.
गेल्या वर्षी 26 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन राणेंनी, आदित्य ठाकरेही कोठडीत जाईल. उद्धव ठाकरे स्वत: मुलाला वाचवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला होता. केसरकरांनी एकाच पत्रकार परिषदेत गौप्यस्फोटांची मालिकाच लावली. शिंदेंसोबत आमदारांनी बंड पुकारल्यावरही, उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मात्र शिंदेंनाच वेगळं करा मग भाजपसोबत युती करतो, असं ठाकरे म्हणाले होते असं केसरकर म्हणतायत. केसरकर जे दावा करत आहेत, असाच दावा गेल्याच महिन्यात खासदार राहुल शेवाळेंनी केला होता. मात्र जे दावे शेवाळे आणि आता केसरकरांकडून झालेत, ते शिवसेनेनं फेटाळलेत.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.