Dipali Chavan case | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, कथित नव्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ

prajwal dhage

prajwal dhage | Edited By:

Updated on: Mar 26, 2021 | 10:59 PM

Dipali Chavan case | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, कथित नवी ऑडिओ क्लिप बाहेर आल्यामुळे राज्यात खळबळ (deepali chavan suicide case audio clip)

अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी (Woman RFO Suicide) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.  DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI