WITT Global Summit : राहुल गांधी डरपोक? आम्ही कोणालाही घाबरत नाही, राजनाथ सिंह यांचा विरोधकांवर निशाणा
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हच्या तिसऱ्या दिवशी होत असलेल्या सत्ता संमेलनात राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, विरोधक रोज काही ना काही वाद निर्माण करत असतात. विशेषत: राहुल गांधींवर हल्लाबोल करत ते म्हणाले....
नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी, २०२४ : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही TV9 च्या WITT पॉवर कॉन्फरन्समध्ये विरोधी पक्षांवर जोरदार ताशेरे ओढले. सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करण्यापासून ते राम मंदिर आणि संसदेतील माईक बंद करण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधत प्रत्युत्तर दिले. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हच्या तिसऱ्या दिवशी होत असलेल्या सत्ता संमेलनात राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, विरोधक रोज काही ना काही वाद निर्माण करत असतात. विशेषत: राहुल गांधींवर हल्लाबोल करत ते म्हणाले, राहुल गांधी स्वत: घाबरले आहेत, म्हणूनच ते घाबरू नका असे बोलतात. ते म्हणाले की, आमचे सरकार कोणालाही घाबरत नाही. आमचे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालले आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, राहुल गांधी स्वतः बोलणे बंद करतात, कोणीही त्यांचा माईक बंद करत नाही.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

