Delhi Lal Quila Blast : कालचा स्फोट घाईत, याहून मोठ्या हल्ल्याचा कट होता! दहशतवादी उमर जैशचा एक्सपर्ट, काय होतं त्याचं प्लानिंग?
दिल्लीत काल झालेल्या स्फोटानंतर मोठी अपडेट समोर आली आहे. हा स्फोट घाईत घडवण्यात आला असून, यापेक्षा मोठ्या हल्ल्याचा कट होता. उमर नावाचा जैशचा VBIED एक्सपर्ट यात सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्लीत काल झालेल्या स्फोटामागे एक मोठा कट होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, कालचा दिल्ली स्फोट घाईत घडवण्यात आला असून, त्याहून मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. डॉ. उमर नावाचा व्यक्ती या कटात सहभागी असून, तो जैश या संघटनेचा VBIED (Vehicle-borne improvised explosive device) एक्सपर्ट असल्याचे उघड झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी फतेहपूर, टांगा गाव आणि धौज या भागात शोध मोहीम सुरू केली आहे. अल्फाला विद्यापीठातही शोध मोहीम सुरू आहे, कारण डॉ. उमर तेथे शिकवत होता. फरिदाबादमध्ये स्फोटक मिळाल्याच्या प्रकरणी मुजम्मिल याला स्लीपर सेलकडून मदत मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत दिल्ली पोलीस आयुक्त, आयबी प्रमुख, एनआयए प्रमुख आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक सुरू आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

