दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाचा गोंधळ संपता संपेना; काय कारण मनस्तापाचं?

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनचा गोंधळ संपता संपेना असाच झाला आहे. सदनातील दोन कंत्राटदाराचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या एका निर्णयानंतर पद्मा आणि सुधीर रावत यांना एका रात्रीत 19 एप्रिल ला कॅन्टीन सोडावे लागले.

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाचा गोंधळ संपता संपेना; काय कारण मनस्तापाचं?
| Updated on: May 21, 2023 | 3:19 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा कॅन्टीनच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे. दोन कंत्राटदारांमध्ये झालेल्या वादात महाराष्ट्र सदन प्रशासनाने नवीन आणि जुन्या महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनला अचानक टाळे ठोकले. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनचा गोंधळ संपता संपेना असाच झाला आहे. सदनातील दोन कंत्राटदाराचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या एका निर्णयानंतर पद्मा आणि सुधीर रावत यांना एका रात्रीत 19 एप्रिल ला कॅन्टीन सोडावे लागले. तर येथे येणाऱ्या लोकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने ताबडतोब नागपूरच्या एका व्यक्तीला कंत्राटाच्या नियमानुसार कॅन्टीन चालवायला दिले. मात्र आता त्याच्याकडून गोंधळ उडाला आहे. ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. येथे प्रचंड अस्वच्छता आणि योग्य सेवा मिळत नाही अशा तक्रारी समोर येत आहेत. याचं कारण ही आता स्पष्ट झाले असून पुर्वीच्या स्टाफला पुर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. तर नवीन कंत्राटदाराने त्यांना घेऊ नये असा दंडक अधिकाऱ्यांनी घातला आहे. तर जुन्या आणि नवीन दरात प्रचंड वाढ आहे. नवीन कंत्राटदाराने देखील दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्यातच दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या जेवनाचा आस्वाद घेण्यासाठी दिल्लीतील मराठी माणसांसह इतर राज्यातील लोक येत असतात. मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे पूर्ण महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे.

Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.