भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीतून मोठी बातमी समोर!

भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीतून मोठी बातमी समोर!

| Updated on: May 30, 2026 | 3:39 PM

दिल्ली पोलिसांनी मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करत पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI शी संबंधित 9 संशयित एजंट्सना अटक केली आहे. हे संशयित देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील काही व्यक्तींसह काही परदेशी नागरिकांचाही या कटात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयितांचे मुंबई अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे सर्वजण ISI च्या सूचनेनुसार भारतात घातपात करण्याचा कट रचत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये स्फोटके, ग्रेनेड्स आणि इतर घातक शस्त्रांचा समावेश आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पॉवर प्लांट्स, न्यूक्लियर प्लांट्स, वीज केंद्रे, विमानतळ आणि रेल्वे स्थानके ही त्यांच्या संभाव्य लक्ष्यांमध्ये होती. पाकिस्तानमधून पाठवण्यात आलेली स्फोटकेही पोलिसांनी वेळेत जप्त केली आहेत. भारतातील नागरिकांचा वापर करून हल्ले घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही समोर आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा कट उधळण्यात यश आले आहे.

Published on: May 30, 2026 3:39 PM
Follow Us