Delhi Lal Quila Blast : लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ इको व्हॅनमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन परिसरात मंगळवारी सायंकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी एका इको व्हॅनमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. या भीषण घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या आठ ते दहा गाड्या जळून खाक झाल्या. अनेक वाहनांचे तुकडे-तुकडे झाले.
या घटनेनंतर परिसरात तात्काळ पोलीस, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL), राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे (NSG) पथक पोहोचले. प्राथमिक तपासानुसार, पोलीस सूत्रांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. स्फोटाची तीव्रता पाहता हा बॉम्बस्फोट असल्याचेही म्हटले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दिल्ली आणि बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published on: Nov 10, 2025 09:31 PM
