Delhi Blast Video : आई पहिलं प्रेम, बाप ताकद.., कुटुंबासोबत जेवणाचा होता प्लॅन पण… स्फोटात 34 वर्षीय अमर कटारियाचा मृत्यू!
दिल्लीतील रेड फोर्ट स्फोटात ३४ वर्षीय अमर कटारिया यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कटारिया यांच्या हातावर आई-वडिलांबद्दल टॅटू होता आणि स्फोटापूर्वी त्यांचा कुटुंबासोबत जेवणाचा बेत होता. मात्र क्षणार्धात सगळं संपलं.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत ३४ वर्षीय अमर कटारिया यांचा मृत्यू झाला आहे. अमर कटारिया यांच्या हातावर आई माझं पहिलं प्रेम, वडील माझी ताकद (Mom My First Love, Dad My Strength) अशा आशयाचा टॅटू होता. कुटुंबासोबत जेवण करण्यासाठी बाहेर जाण्याचा त्यांचा बेत होता, मात्र त्यापूर्वीच स्फोटात त्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, स्फोटाशी संबंधित तपास सुरू असताना स्फोटात वापरल्या गेलेल्या i20 कारचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे फुटेज बदरपूर टोलनाक्याचे आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, संशयित उमर सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी बदरपूर टोलनाक्यावरून दिल्लीमध्ये दाखल झाला होता. फुटेजमध्ये संशयित उमरने मास्क घातलेला दिसत आहे. यापूर्वी सकाळी ७ वाजता संशयित उमरची i20 कार फरीदाबादमधील एशियन हॉस्पिटलसमोरूनही गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

