Delhi Lal Quila Blast : आईचा फोन… लायब्ररीत असल्याचा बहाना, पण डोक्यात माणसं मारण्याचा कट… हल्ल्याच्या काही तास आधी दहशतवादी उमरने काय केलं?
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाप्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. सूत्रांनुसार, डॉ. उमर-ऊ-नबी याने तपास यंत्रणांच्या भीतीने हा स्फोटाचा कट रचला. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने कारमध्ये डेटोनेटर लावून स्फोट घडवून आणल्याचे कळते. या प्रकरणात उमरच्या आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोटप्रकरणी तपास यंत्रणांना शोध घेत असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना दिसताय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उमर-ऊ-नबी याने तपास यंत्रणांच्या भीतीने हा स्फोटाचा कट रचला होता. अटक होण्याच्या भीतीने त्याने कारमध्ये डेटोनेटर लावून स्फोट घडवून आणल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी उमरच्या आईला ताब्यात घेतले असून, उमरने आईला कॉल करून त्रास देऊ नकोस असे सांगितले होते. आईचा फोन आला तेव्हा उमरेने लायब्ररीत असल्याचा बहाना केला. मात्र त्याच्या डोक्यात माणसं मारण्याचा कट शिजत होता. तसेच, काही दिवस लायब्ररीत असल्याचे त्याने आईला सांगितले होते. उमरची आई आणि दिराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्याच्या वहिनीने टीव्ही९ मराठीला दिली आहे. उमरची वहिनी मात्र उमर असे काही करणार नाही असा विश्वास व्यक्त करत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

