Delhi Lal Quila Blast : त्याला एकच भिती म्हणून त्यानं दिल्ली स्फोटाचा भयानक कट रचला! दहशतवादी उमरच्या डोक्यात काय होतं?
दिल्लीतील कार स्फोटानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तपास यंत्रणांच्या भीतीने डॉ. उमर-ऊ-नबीने स्फोटाचा कट रचल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. जैश-ए-मोहम्मदसाठी महिलांची भरती करणाऱ्या डॉ. शाहिनाला फरिदाबादमधून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, दिल्ली पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोटप्रकरणी तपास यंत्रणांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उमर-ऊ-नबी याने तपास यंत्रणांच्या भीतीने हा स्फोटाचा कट रचला होता. अटक होण्याच्या भीतीने त्याने कारमध्ये डेटोनेटर लावून स्फोट घडवून आणल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
दरम्यान, दिल्लीतील या स्फोटानंतर देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर आणि शिर्डी येथील साई मंदिरात विशेष खबरदारी घेतली जात आहे. भाविकांची कसून तपासणी केली जात आहे. हँड मेटल डिटेक्टर, फ्रेम मेटल डिटेक्टर आणि स्कॅनरचा वापर करून बॅगा आणि महिलांच्या पर्सची तपासणी केली जात आहे. शिर्डी साई मंदिरात लाखो भाविक येत असल्याने आणि धमकीचे ईमेल्स प्राप्त झाल्याने, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच पोलीस कायमस्वरूपी तैनात असतात. अशा घटनांनंतर पोलीस आणि मंदिर प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे पाहायला मिळतंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

