Delhi Lal Quila Blast : दिल्ली स्फोटामागे ‘व्हाईट कॉलर’ मॉड्यूलचा सहभाग; 5 डॉक्टरांचं कनेक्शन उघड अन् सगळ्यांना अटक
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटामागे व्हाईट कॉलर मॉड्यूल कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पाच डॉक्टरांचा संबंध समोर येत असून, एटीएसने अनेक ठिकाणी छापेमारी करत महत्त्वपूर्ण अटक केली आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील झालेल्या स्फोटामागे व्हाईट कॉलर मॉड्यूल कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकूण पाच डॉक्टरांचा संबंध असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले आहे. फरिदाबाद स्फोटक प्रकरण आणि दिल्लीतील घटनेनंतर लखनऊमध्येही एटीएसकडून छापेमारी करण्यात आली आहे.
या तपासादरम्यान, जम्मू-काश्मीर आणि फरिदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत 2900 किलो आयईडी बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. ही कारवाई जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आंतरराज्य नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी करण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये पुलवामा येथील डॉ. उमर मोहम्मद, अनंतनाग येथील डॉ. आदिल अहमद राठोर, फरिदाबाद येथील डॉ. शाहिना शाहीद, हैदराबाद येथील डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद आणि काश्मीरचे डॉ. मुजम्मिल शकील यांचा समावेश आहे. डॉ. शाहिनावर जैश संघटनेसाठी महिलांची भरती करण्याची जबाबदारी होती, तर डॉ. अहमद मोहियुद्दीन विषारी रसायने तयार करत होता. पंतप्रधान मोदींनी या षडयंत्रामागील सूत्रधारांना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

