Chhatrapati Sambhajinagar | मोठं संकट? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या… गावकऱ्यांच्या पोटात गोळा; नेमंक काय घडलं?
दिल्लीहून शिर्डीकडे जाणाऱ्या विमानाला काल रात्री खराब हवामानाचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील विविध गावांवर हे विमान वारंवार घिरट्या मारताना दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दिल्लीहून शिर्डीकडे जाणाऱ्या विमानाला काल रात्री खराब हवामानाचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील विविध गावांवर हे विमान वारंवार घिरट्या मारताना दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिलोनी शिवारासह जानेफळ, नारळा, रहाडी, वाघाळा, भायगाव आणि खंडाळा या गावांच्या परिसरात जवळपास अर्धा तास विमान आकाशात सतत चकरा मारत होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली.
या घटनेची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी विमानतळ अधिकाऱ्यांशी तसेच पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित विमान खराब हवामानामुळे मार्ग भरकटल्याने घिरट्या मारत असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Published on: Mar 31, 2026 12:14 PM
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या

