Ajit Pawar | शरद पवारांविषयी बोलताना तारतम्य बाळगावं – अजित पवार

नवीन पिढीन कोणत्याही ज्येष्ठ नेत्याविषयी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तरुण पिढीला दिलाय.

राजकीय आयुष्याला मला तीस वर्ष पूर्ण झाली. सहा महिने दिल्लीला राहिलो. मात्र माझं मन राज्याच्या राजकारणत अधिक रमतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले. नवीन पिढीन कोणत्याही ज्येष्ठ नेत्याविषयी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची उंची, विचार करण्याची क्षमता पाहता योग्य मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Published On - 4:11 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI