Sanjay Shirsat | मंत्रीपदाची इच्छा, पण दबावतंत्राचा वापर अजिबात नाही, संजय शिरसाट यांनी स्पष्ट केली भूमिका

Sanjay Shirsat | मंत्रीपदाची इच्छा आहेच पण त्यासाठी कुठल्याही दबावतंत्राचा वापर आपण अजिबात करत नसल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 13, 2022 | 3:46 PM

Sanjay Shirsat | मंत्रीपदाची (Ministry) इच्छा आहेच पण त्यासाठी कुठल्याही दबावतंत्राचा वापर आपण अजिबात करत नसल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या ट्विटर हँडलवरुन (Twitter Handle) उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याचे ट्विट झळकले होते. शिरसाट हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. पण त्यांचा पत्ता रात्रीतून कट झाला होता. तर दुसरीकडे टीईटी घोटाळा (TET Scam) झाल्याचा आरोप होऊन ही पक्षश्रेष्ठींनी अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात कॅबिनेट पदाची माळ घातली. या सर्वांचा समाज माध्यमांवर (Social Media) उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. शिरसाट हे शिंदे यांच्यावर प्रेशर टॅक्टीस (Pressures Tactic) वापर असल्याचा आरोप ही होत आहे. या प्रश्नावर शिरसाट यांनी भावना मोकळ्या केल्या. आपल्याला कॅबिनेट पद हवे आहे आणि तशी इच्छा ही आपण शिंदे यांना जाहीरपणे सांगितली आहे. त्यांनी ही मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री करण्याचा शब्द दिल्याचे सांगत, आपण कुठलेही दबावतंत्र वापरत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें