Devendra Fadnavis : ये पब्लिक है… सब जानती है…पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला
' पहिल्यांदा स्वतःच कमिटी तयार करायची. कमिटीचा अहवाल घ्यायचा. पहिली ते बारावी मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य असा अहवाल स्वतः कॅबिनेटला स्वीकारायचा आणि मग त्यानंतर पलटी मारायची.'
आधी हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करायची आणि नंतर पलटी मारायची असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे पब्लिक है सब जानती है… असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. ते वर्धा येथे बोलत होते.
‘आता निवडणुका जशा जवळ येतील नवीन नरेटिव्ह सुरू होतील. आता भाषेच्या संदर्भात देखील आपल्या सरकारने मराठी भाषा अनिवार्य केली. पण नरेटिव्ह कसा तयार केला जातोय? जणू काही ही लढाई मराठी विरूद्ध हिंदी आहे. ही मराठी विरूद्ध हिंदी लढाई नाहीये. मराठी अनिवार्यच आहे. तिसरी भाषा कुठली? मराठी सोबत कुठली? एवढाच विवाद आहे. त्यात आपण सांगितलं कुठलीही भारतीया भाषा याठिकाणी चालेल. पण समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न होत आहे’, असं फडणवीस म्हणाले.
पुढे ते असेही म्हणाले, भाषेवरून मराठी आणि हिंदी, मराठी आणि इतर भाषा आणि महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य राहील. मराठीचा आम्हाला स्वाभिमान आहे. मराठीकार त्याला अभिजात भाषेचा दर्जा देणारे पंतप्रधान मोदी आहेत. पहिलं मराठी विद्यापीठ अमरावतीमध्ये तयार करणारं आमचं सरकार आहे. इतक्या वर्षात तुम्ही ते करू शकला नाही. पण तरी देखील जाणीवपूर्वक याठिकाणी विवाद निर्माण करायचे. ये पब्लिक है… सब जानती है… असं फडणवीसांना म्हणत ठाकरेंना टोला लगावला.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

