Devendra Fadnavis :..तरी घरी बसलो असतो, उपमुख्यमंत्रीपद घेण्याच्या निर्णयावर पहिल्यांदाच फडणवीसांनी मौन सोडलं

'महाविकास आघाडीच्या काही लोकांनी माझी टिंगल टवाळी केली. परंतु मी माझं काम कधीचं थांबवलं नाही. मला माझ्या पक्षाने घरी जरी बसवलं असतं. तरी मी घरी बसलो असतो.' असं फडणवीस म्हणालेत. यावेळी त्यांनी शायरी देखील म्हटली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jul 04, 2022 | 2:44 PM

मुंबई : आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टिंगल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या (MVA) काही लोकांनी माझी टिंगल टवाळी केली. परंतु मी माझं काम कधीचं थांबवलं नाही. मला माझ्या पक्षाने घरी जरी बसवलं असतं. तरी मी घरी बसलो असतो.’ असं फडणवीस म्हणालेत. आजच्या भाषणात फडणवीसांनी त्यांच्या शैलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना उत्तरं दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेरोशायरी देखील केली. अभिनंदनाच्या प्रस्तावाचं  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं तोंडभरून कौतुक केलं. ‘शिवसेना भाजप युतीचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला. याबाबत मी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो,’ असं फडणवीस म्हणालेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें