अंबादासजी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या!; नामांतरावरून दावनेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर
औरंगाबादच्या नामांतरावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारला आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलेत. त्यांच्या या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा...
मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारला आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलेत. त्यांच्या या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!”, असं ट्विट करत फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
अंबादास जी,
आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. https://t.co/DyWaqjXlvO— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
Published on: Feb 25, 2023 09:39 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
