CM Fadnavis : फडणवीसांचा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फोन, राज्याच्या राजकारणात घडतंय काय?
देवेंद्र फडणवीस यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना केली. शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. संजय राऊत यांनी फडणवीसांच्या विनंतीवर प्रश्न उपस्थित केले.
उपराष्ट्रपती पदासाठी इंडियाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना विनंती केली आहे. आम्हाला इंडियाच्या उमेदवाराला पाठिंबा देता येणार नाही असं शरद पवार यांनी फडणवीसांना सांगितलं. दरम्यान, ज्यांचा पक्ष फोडला त्यांच्याकडे पाठिंबा का मागताय? असा सवाल संजय राऊत यांनीही केला आहे.
‘उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत. आपले राज्यपाल आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी समर्थन द्यावं, अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली’, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत असे म्हटले की, ‘उपराष्ट्रपतीच्या फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो. शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष फोडला, आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकत घेतले. आता त्याच पक्षाकडे मत मागताय’
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

