Devendra Fadnavis Jal Akrosh Morcha | हा संभाजीनगर मधला अभूतपूर्व मोर्चा – Devendra Fadnavis

‘संभाजीनगरच्या इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा असेल तर तो आजचा मोर्चा असेल. एका पत्रकाराने मला आठवण करुन दिली. आमचे नेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वात याच रस्त्यावरुन एक मोर्चा काढला होता.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 23, 2022 | 8:50 PM

औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या मोर्चात उंटांवर, ऑटो रिक्षावरही रिकाम्या घाबरी बांधण्यात आल्या होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘संभाजीनगरच्या इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा असेल तर तो आजचा मोर्चा असेल. एका पत्रकाराने मला आठवण करुन दिली. आमचे नेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वात याच रस्त्यावरुन एक मोर्चा काढला होता. हा मोर्चा जनतेचा आहे, त्यांचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला (Jal Akrosh Morcha) संघटित करण्याचं काम भाजपनं केलं. ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी त्राहीमाम चालला आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसतोय, त्यावेळी भाजप शांत बसणार नाही. मी इशारा देतो ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचेल त्याच वेळी हा संघर्ष संपेल. तोवर आम्ही तुम्हाला स्वस्थ झोपू देणार नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें