ज्यांनी देशातलं सोनं…देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर सडकून टीका!
अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. प्रामुख्याने मुख्यमंत्री शेती, वीज पुरवठा, कर्जमाफी, पंतप्रधानांचा यशस्वी कार्यकाळ अशा अनेक विषयांवर बोलले. मात्र सर्वांचे लक्ष भाषणातील अखेरच्या वक्तव्याने वेधले.

मुख्यमंत्री अलीकडेच गिरीश महाजनांच्या शीख समुदायावरील वादावर देखील बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांच्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या काळात शिखांवर अन्याय, अत्याचार झाला याचा निषेध आम्ही जन्मभर करत राहू, असे फडणवीस म्हणाले.
भाषणाच्या अखेरीस त्यांना काँग्रेसच्या दाव्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, ज्या पक्षाने (काँग्रेसने) देशातील सोनं गहाण ठेवलं, टूजी, थ्रीजी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, इतकेच नाही तर ऑईल बाँड या कर्जाखाली देशाला दाबलं, त्या पक्षाविषयी मला काही बोलायचे नाही. ऑईल बाँड हे 2005 ते 2006 या वर्षांदरम्यान देशाला आर्थिक अस्थिरतेतून काढण्यासाठी करण्यात आलं होतं, अशी चर्चा आहे. यामध्ये खरेदी केलेल्या इंधनाचं कर्ज व्याजासकट पुढच्या जवळपास १० वर्षांनंतरची पिढी फेडेल असं सांगितलं जातं.
Published on: Jun 10, 2026 03:41 PM
'मविआ'ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग...
20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आंदोलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!
राष्ट्रवादीत मोठा उलटफेर! रोहित पवारांनी सांगितलं 15 दिवसांतच पक्ष...
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरणेंचं उत्तर