Nawab Malik | फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचा धंदा, मलिकांनी दाखवला अमृता फडणवीसांचा व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्याच छत्रछायेखाली ड्रग्ज रॅकेट सुरु होते. यापैकी एका ड्रग्ज पॅडलरने अमृता फडणवीस यांच्या एका गाण्यासाठी वित्तपुरवठा केला होता.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्याच छत्रछायेखाली ड्रग्ज रॅकेट सुरु होते. यापैकी एका ड्रग्ज पॅडलरने अमृता फडणवीस यांच्या एका गाण्यासाठी वित्तपुरवठा केला होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपांवर अमृता यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आता थोड्याचवेळात देवेंद्र फडणवीस हेदेखील पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण कितपत रंगणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Published On - 11:10 am, Mon, 1 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI