मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने वेधलं लक्ष, वंदे भारत ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वतः वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. ते मुंबईवरून ट्रेनने शिर्डीला आले. त्यांनी इतरांसमोर आपल्या कृतीतून उदाहरण ठेवलं. आपल्या या ट्रेन प्रवासाच्या अनुभवाबद्दल त्यांनी मीडियाशी आपल्या भावना व्यक्त केल्या. इतकेच नाही, तर या प्रवासादरम्यानच्या त्यांच्या एका कृतीने विशेष लक्ष वेधले.

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर देवेंद्र फडणवीस हे आधी बाईकवरून मंत्रालयाला पोहोचले होते. यानंतर आता त्यांचा वंदे भारत ट्रेनचा प्रवास चर्चेचा विषय ठरला. मोठे मोठे ताफे न घेता त्यांनी सर्वांप्रमाणे मुंबई ते शिर्डी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला, यावेळी त्यांच्यासोबत प्रसाद लाड देखील होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या एका कृतीने सगळ्यांच्याच नजरा वळवल्या. ट्रेन प्रवासादरम्यान मुख्यमंत्री काही काळ सगळ्यांशी संवाद साधत होते आणि नंतर लगेच कामाला लागले. ते स्वतःच्या फाईल्सचे काम पूर्ण करू लागले. या वेळचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.