Narendra Patil | नरेंद्र यांच्या हातावर देवेंद्र यांचं नाव, कामगार नेते Exclusive

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे.

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.  माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटावर देवेन्द्र हे नाव कोरले आहे. विरोधीपक्ष नेते “देवेन्द्र फडणवीस” यांचंच हे नाव कोरलं आहे, असं नरेंद्र पाटलांनी स्पष्ट केलं. “त्याचं कारण म्हणजे एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की नरेंद्र पाटील हे आमच्या मनात आहेत आणि म्हणून देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलं आहे. आणि याचा मला आनंद आहे. मला खूप बरं वाटतंय कारण ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत” अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI