लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी? घोंगडी बैठकीपूर्वी जरांगे अन् मुंडेंमध्ये काय चर्चा?
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मध्यरात्री अंतरवली सराटी गावात जाऊन मुंडेंनी जरांगेंची भेट घेतली आहे. मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात दीर्घ चर्चा झाली. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मी लढत राहणार आहे. ते आरक्षण फक्त ओबीसीतून मिळावं, यासाठी कायम ठाम असणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची मध्यरात्री भेट झाली आहे. तर आज मुंडेंच्या परळी मतदारसंघात मनोज जरांगे पाटील हे घोंगडी बैठक घेणार आहेत. आज होणाऱ्या घोंगडी बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली होती. तर विरोधात कोणताही भूमिका घेऊ नये म्हणून मुंडेंची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बोलणी सुरू आहे का? असा सवाल सध्या केला जात आहे. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांना चांगलाच फटका बसला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे खबरदारी घेतायत का? असा सवाल उपस्थित करत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

