Dhananjay Munde : ज्याच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्या…. खंदा समर्थकच विरोधात, मुंडेंचा नाव न घेता निशाणा
परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडेंनी आपण कधीही जाती, पात किंवा धर्माचे राजकारण केले नाही, असे ठामपणे सांगितले. परळीतील आझाद नगर येथे झालेल्या या प्रचारसभेत त्यांनी महायुतीचे उमेदवार महानंदा काकू आवळे, शकील भाई कुरेशी, कार्तिक कांबळे आणि कैसर बी राजा खान यांच्यासाठी मतदारांना आवाहन केले.
परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात धनंजय मुंडेंनी आपण कधीच जातीपातीचे राजकारण केले नसल्याचा दावा केला. त्यांनी पाणीपुरवठा, घरकुल, निराधारांच्या पेन्शनसारख्या अनेक विकासकामांची माहिती दिली. मराठवाड्यात परळीने सर्वाधिक घरकुल योजना राबवल्याचे सांगत, महायुतीच्या उमेदवारांना घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत असताना धनंजय मुंडे यांनी आपल्या माजी समर्थक दीपक देशमुख यांच्यावर नाव न घेता टीका केली. दीपक देशमुख धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक होते, मात्र आता त्यांची पत्नी पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ज्याच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्याविरोधात उभा असे म्हटले.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

