Dhananjay Munde Video : ‘…तर गप्प बसणार नाही’, आईचा उल्लेख करत मुडेंचा सुरेश धसांना थेट इशारा
धनंजय मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे. एका ट्विटच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांना चांगलंच फटकारलं असून थेट इशारा दिला आहे.
‘माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही’, असा इशारा धनंजय मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना दिला. धनंजय मुंडे यांनी एक ट्वीट करत सुरेश धस यांना उत्तर दिलं आहे. ‘धनंजय मुंडे आणि कराडच्या सोबतीला कंटाळून आई परळीतून नाथरा या गावाला गेल्या’, असा दावा सुरेश धस यांनी एका मुलाखतीतून केला होता. यालाच धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आहे. ‘परळीतील निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने आईसह नाथरा या गावातील घरात आम्ही राहत आहोत. ज्यांनी आरोप केले त्यांनीच या आधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते. काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले. माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केले गेले. मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे’, असं धनंजय मुंडे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे.’

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
