Dharashiv : बोलता येईना अन् चेहराही फुटलेला… ZP च्या शाळेत गुरुजीच झिंगले, पुढं काय झालं? तुम्हीच बघा
धाराशिवमध्ये एका शिक्षकाने दारूच्या नशेत एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले. चिंचपूर बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. तर सोमवार पासून दारू पिणार नाही शिक्षकाने गावकऱ्यांना आश्वासन दिलंय. दरम्यान, गावकऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अजबच प्रकार पाहायला मिळाला. शिक्षकाने थेट वर्गावर दारू पिऊन एन्ट्री केली. शिक्षकाच्या वारंवार अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यांसह गावकरी त्रस्त झाल्याची माहिती आहे. दारू पिणाऱ्या या शिक्षकाचं नाव मोहोळकर असं असून हा प्रकार मुख्याध्यापकांच्या लक्षात येताच त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि सरपंच यांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच, सदस्य आणि पालक शाळेत दाखल झालेत. त्यांनी संबंधित शिक्षकाला पाहिले असता तो शिकवण्याच्या अवस्थेत नव्हता. या संपूर्ण घटनेचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलवर व्हिडिओ चित्रण केले. संबंधित शिक्षकाला यापूर्वीही मद्यपान करून शाळेत न येण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. माञ शिक्षकाचे दारु पिणे थांबले नाही आज याप्रकरणी गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यासगळ्या प्रकारानंतर सोमवारपासून मद्य प्राशन करणार नसल्याचा शब्द या शिक्षकाने गावकऱ्यांसह शाळेतील शिक्षकांना दिल्याचे सांगितले जात आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

