Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
अभिनेता दिनो मोरियाची मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू झाली आहे. करोडो रुपयांच्या या घोटाळ्यात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या दिनो मोरियाला मुंबईतील सीपी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. या प्रकरणातील सत्य काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अभिनेता दिनो मोरियाची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू झाली आहे. मुंबईतील सीपी (पोलीस आयुक्त) कार्यालयात आज त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मिठी नदीच्या गाळ उपसा प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून, या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनो मोरियाला आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाते, आणि मिठी नदीच्या टेंडर घोटाळ्याशी त्याचा संबंध जोडला जात आहे. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यापूर्वीही आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी झाली होती. आता पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या चौकशीतून नेमके काय सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Oct 02, 2026 02:08 PM
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..

