Santosh Deshmukh Case Video : बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? मुख्यमंत्र्यासोबत बंद दाराआड काय झाली चर्चा?

Santosh Deshmukh Case Video : बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? मुख्यमंत्र्यासोबत बंद दाराआड काय झाली चर्चा?

| Updated on: Jan 17, 2025 | 2:24 PM

बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजयम मुंडे हे केज न्यायालयात जबाब नोंदवणार आहेत. केज न्यायालयातील न्यायाधीशांसमोर धनंजयम मुंडे हे जबाब नोंदवणार आहेत. १६४ अंतर्गत हा जबाब नोंदवण्यात येणार आहे. तर १६४ अंतर्गत नोंदवलेला जबाब बदलला जात नाही. तर दुसरीकडे बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड भेट घेतली. उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दहा मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. मात्र या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. तर बीड प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहवं, अशी विनंती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे यासंदर्भात काही बोलणं झालं का? हे अद्याप समोर आलेलं नाही.

Published on: Jan 17, 2025 02:24 PM