Pune Corona | पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर बंदी; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

पुण्यातील कोरोना रुग्णसंख्याही वाढू लागली होती. त्यामुळे आता निर्बंध अधिक कठोर करत पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय. गर्दी रोखण्यासाठी आणि संसर्ग वाढू न देण्यासाठी हे नवे निर्णय जाहीर करण्यात आले आहे.

पुणे : ऐन गुलाबी थंडी रंगात आलेली असताना पुण्यात पर्यटन स्थळांवर (Pune Tourist Point) जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना हिरमोड होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह सर्व पर्यटन जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध (Strict Restrictions) लागू केले आहेत. पुण्यातील कोरोना रुग्णसंख्याही वाढू लागली होती. त्यामुळे आता निर्बंध अधिक कठोर करत पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय. गर्दी रोखण्यासाठी आणि संसर्ग वाढू न देण्यासाठी हे नवे निर्णय जाहीर करण्यात आले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI