दिवे घाटात पालखीवर नजर ड्रोनची; पोलिसांची खास सोय

पालखी सोहळ्यासाठी पोलिसांनी ड्रोनवरून वारी लक्ष ठेवले होते, त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी आणि महिला वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, पाणी व्यवस्था, आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे.

महादेव कांबळे

|

Jun 24, 2022 | 10:05 PM

दिवे घाटात संत ज्ञानेश्वरी पालखीचे माऊलीच्या जयघोषात आणि अभंगाच्या निनादात आगमन झाले. कोरोना महामारीनंतर सलग दोन वर्षांनी संत ज्ञानेश्वरी पालखीचे दिवे घाटात आगमन झाले. त्यामुळे राज्यभरातील वारकरी, नागरिकांनी या पालखीसाठी हजेरी लावली होती. पालखीनिमित्ताने सगळा दिवेघाट आज वारकऱ्यांच्या अभंगानी ओसंडून गेला होता. या पालखी सोहळ्यासाठी पुणे आणि पुण ग्रामीण विभागाने खास सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. पालखी सोहळ्यासाठी पोलिसांनी ड्रोनवरून वारी लक्ष ठेवले होते, त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी आणि महिला वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, पाणी व्यवस्था, आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें