Dombivali MIDC : गदारोळ पळापळ अन्..; डोंबिवली MIDC मध्ये भीषण आग
डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विश्वनाथ गारमेंट आणि एरोसेल या दोन कंपन्यांना लागलेल्या या आगीत प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी फेज वन येथील विश्वनाथ गारमेंट कंपनीला दुपारी अचानक आग लागली, जी नंतर एरोसेल कंपनीपर्यंत पसरली. या आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. विश्वनाथ गारमेंट ही कापड प्रक्रिया करणारी कंपनी आहे, आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत आहेत.
या कापड प्रक्रिया कंपनीत लागलेली आग इतकी भीषण होती की, कंपनीतील सर्व सामग्री जळून खाक झाली. सुरुवातीला ही आग ट्रान्सफॉर्मरला लागली आणि नंतर ती संपूर्ण कंपनीत पसरली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आणि एमआयडीसी परिसरात मोठी धावपळ उडाली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

