Chandrahar Patil Video : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची मोठी घोषणा, मानाच्या दोन्ही गदा परत करणार, नेमकं कारण काय?
शिवराज राक्षे यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करत शिवराजने पंचाची कॉल धरली आणि लाथही मारली. या कृतीचं डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांने समर्थन केलं आणि शिवराज राक्षे याने स्वत: पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं वक्तल्य केलं होतं.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपांत्य सामन्यामध्ये शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याची चर्चा होतेय. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली. दरम्यान, महेंद्र गायकवाड याने सामना संपायला काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलं. तर शिवराज राक्षे यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करत शिवराजने पंचाची कॉल धरली आणि लाथही मारली. या कृतीचं डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांने समर्थन केलं आणि शिवराज राक्षे याने स्वत: पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं वक्तल्य केलं होतं. दरम्यान, या निकालानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. स्पर्धेत दिलेल्या निर्णयाच्या वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुन्हा आक्रमक होत त्यांनी आपल्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे, पंचांचे निर्णयामुळे आपल्याला पराभवाला समोर जावं लागलं, त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या, तर त्याचं मला समाधान वाटेल. नाहीतर मी माझ्या डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा येत्या 2 दिवसात कुस्तीगिरी परिषदेला परत देणार असल्याचं चंद्रहार पाटलांनी जाहीर केले आहे.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?

