अजित पवार गट शरद पवार गटाला देणार धक्का? अजित पवार यांच्या गटात आणखी एका ‘पुतण्या’ची एन्ट्री
VIDEO | शरद पवार यांच्या खेळीला पुतण्या अजित पवार यांचं चोख प्रत्युत्तर, शरद पवार गटाला अजित पवार यांचा गट धक्का देण्याच्या तयारीत
बीड, २२ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीतील अजित पवारांचा गट बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 17 तारखेला शरद पवार यांची सभा झाली. या सभेआधीच जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे अजित पवार यांच्या गटात प्रवेश घेणार होते. मात्र काही कारणास्तव विलंब झाला. अखेर योगेश क्षीरसागर यांच्या प्रवेशाची तारीख जाहीर झालीय. क्षीरसागर कुटुंबातील आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यानंतर आता डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या गटात उद्या मुंबईत जाहीर करणार आहेत. दुसरा पुतण्याही फुटल्याने जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का मानला जातोय. आमदार संदीप क्षीरसागर यांना कोंडीत पकडण्यासाठी धनंजय मुंडे यांनी ही राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे. योगेश क्षीरसागर यांच्यासमवेत अनेक नेत्यांचे देखील प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

