VIDEO : चालक खाली पडला, विनाड्रायव्हर बुलेट सुसाट, पुण्यातील VIDEO पाहाच!

VIDEO : चालक खाली पडला, विनाड्रायव्हर बुलेट सुसाट, पुण्यातील VIDEO पाहाच!

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 8:55 AM

चालक नसलेली एक दुचाकी भर रस्त्यावर सुसाट जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नारायणगाव येथील परेरा पेट्रोल पंपासमोर एक बुलेट भर रस्त्यावरून चालकाविना सुसाट चाललेली पाहायला मिळाली.

पुणे : चालक नसलेली एक दुचाकी भर रस्त्यावर सुसाट जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नारायणगाव येथील परेरा पेट्रोल पंपासमोर एक बुलेट भर रस्त्यावरून चालकाविना सुसाट चाललेली पाहायला मिळाली. या बुलेट मालकाने किंवा चालकाने सुसाट जाताना एका इसमाला उडवले आणि यातला चालक खाली पडला. मात्र बुलेट सरळ सुसाट गेली आणि एका वळणावर वळून खाली पडली. परेरा पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच हिट होतोय.