Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्…194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग

Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्…194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग

| Updated on: Jul 27, 2026 | 6:01 PM

दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे गुजरातमधील राजकोट येथील हिरासर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या सामान ठेवण्याच्या विभागातून धूर दिसू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सुदैवाने विमानातील सर्व 194 प्रवासी सुरक्षित असून कोणतीही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे IGO1452 हे एअरबस A321 विमान दुबईहून मुंबईकडे येत होते. प्रवासादरम्यान कार्गो होल्डमधून धूर दिसल्याची माहिती वैमानिकांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर दुपारी 2:45 वाजता फुल इमरजन्सी घोषित करण्यात आली. तत्काळ राजकोटच्या हिरासर विमानतळावर अग्निशमन दल, 2 फायर टेंडर, 2 रुग्णवाहिका, 108 आपत्कालीन सेवा आणि पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले.

यानंतर विमानाचे दुपारी 3:27 वाजता सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. लँडिंगनंतर सर्व 194 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवाशांना दुखापत झालेली नाही. कार्गो होल्डमध्ये धूर नेमका कशामुळे निर्माण झाला, याचा शोध संबंधित यंत्रणांकडून घेतला जात असून या घटनेची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Published on: Jul 27, 2026 6:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us