Anil Deshmukh Case | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या काटोल आणि वडविहिराच्या घरांवर ईडीचा छापा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे. आधीच देशमुखांच्या साडेतीनशे कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असताना आता देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.

नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI