Video : “मी पुन्हा येईन’ या नादात माझंच फोन टॅपिंग”, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
राज्यात सध्या फोन टॅपिंगवरून (Phone Tapping) जोरदार आरोप सुरू झाले आहेत. याबाबत ज्या नेत्यांचे फोन टॅप केले त्यांचे जबाब आताा नोंदवण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला आता चांगलाच वेग आणला आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात […]
राज्यात सध्या फोन टॅपिंगवरून (Phone Tapping) जोरदार आरोप सुरू झाले आहेत. याबाबत ज्या नेत्यांचे फोन टॅप केले त्यांचे जबाब आताा नोंदवण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला आता चांगलाच वेग आणला आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. आता याचवरून फडणवीसांचा कट्टर विरोधक एकनाथ खडसेही (Eknath Khadase) चांगलेच आक्रमक झाले आहेत. कारण एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, या नादात माझं फोन टॅपिंग करण्यात आलं, असे म्हणत खडसेंनी पुन्हा फडवीसांवर निशाणा साधला आहे.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

