एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, ‘दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं…’
मुक्ताईनगरमध्ये रूपाली चाकणकर यांनी खडसे कुटुंबावर निशाणा साधला होता. खडसे परिवारात सध्या कोण कोणत्या पक्षात आहे? हे आपल्याला माहिती नसल्याची खोचक टीका रुपाली चाकणकर यांनी केली होती. या टीकेनंतर एकनाथ खडसेंकडून त्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे आणि परिवारावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. ‘सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार?’ असा सवाल करत रोहिणी खडसेंवर निशाणा साधला तर आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवला नाही आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत, असे म्हटले. यानंतर रोहिणी खडसेंनीही यावर पलटवार केला. तर एकनाथ खडेसेंनी रूपाली पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही, असं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांनी रूपाली चाकणकर यांना खोचक टोला लगावला आहे. तर रूपाली चाकणकर यांनी आधी स्वतःचं बघावं, असही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. ‘दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही, पहिले आपलं पाहावं. आपणही पहिले शरद पवार यांच्याकडे होत्या आता अजित दादा पवार यांच्याकडे आहात’, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.