माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकर रोहिणी खडसेंना काय म्हणाले? एकनाथ खडसेंनी सगळंच सांगितलं
एकनाथ खडसे यांनी रेव्ह पार्टी प्रकरणी आपल्याला आणि आपल्या जावयाला फसवण्याचा कट केला जात असल्याचं सांगितलं आहे.
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनीच महिलेची न्यायालयीन कोठडी मागितली असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे. गांजासदृश्य पदार्थ सापडला, मग न्यायालयीन कोठडी कशी मागितली? असा प्रश्न देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. तर प्लांट केल्याशिवाय पार्टीत महिला येऊच शकत नाही, असंही खडसे म्हणालेत.
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश आहे. मात्र हा सर्व आपल्याला फसवण्याचा कट असल्याचा आरोप आता एकनाथ खडसे यांच्याकडून केला जात आहे. याबाबत खडसे यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले की, या प्रकरणातील महिला आरोपीसह पोपटानी आणि श्रीपाद यादव यांना प्लांट करण्यात आलं आहे. यादव आणि पोपटानी हे गेल्या 15 दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकर यांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले आहेत. या प्रकरणी मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणार, यासंदर्भात असिम सरोदे यांच्याशी चर्चा झाली आहे. पुणे पोलीसांनी कोर्टात काल राहुल नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला, हे सर्व प्रकरण प्लांट असल्यामुळे यापुढे आणखी काही नावं पोलीस आणू शकतील, असं एकनाथ खडसे यांनी म्हंटलं.
दरम्यान, देवा शपथ सांगतो मी असं काही केलं नाही, माझं त्या मुलींशी काही संबंध नाही, असं काल कोर्टात प्रांजलने रोहिणी खडसेना सांगितलं. पुणे पोलीसांनी आमची बदनामी करण्यासाठी हे सर्व प्लांट केलं आहे. पुणे पोलीस आयुक्त आमच्या प्रश्नाना उत्तरं का देत नाही? असंही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

