AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse | खडसेंच्या डोक्यातून अजूनही भाजप जात नाही, बैठकीनंतर माहिती देताना तोंडी भाजपचं नाव

| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 12:12 AM
Share

जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करण्याऐवजी चुकून भाजपचा उल्लेख केला.

जळगाव : भाजप नेत्यांवर जोरदार हल्ले चढवत आणि गंभीर आरोप करत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा. पण आजही खडसेंच्या मनातून भाजप जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करण्याऐवजी चुकून भाजपचा उल्लेख केला. त्यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी कोटी करत अजूनही डोक्यातून भाजप जात नसल्याचं म्हटलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.