Eknath Shinde : लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असं म्हणत शिंदेंनी अजितदादांकडे पाहिलं अन्…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असे ठामपणे सांगितले. विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत, सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबियांना मदत आणि रमाबाई नगरमध्ये माता रमाबाईंच्या स्मारकाची निर्मिती यावरही भर देण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असे म्हणत योजना सुरूच राहणार असल्याचे म्हणत लाभार्थ्यांना आश्वस्त केले. यासह शिंदेंनी विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही जनतेला केले. महाराष्ट्र विकास आणि लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सरकारने पूरपरिस्थितीमध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याचे नमूद केले. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे. या कार्यक्रमात, परमेश्वर कदम यांनी सुचवल्यानुसार, देशासाठी शहीद झालेले जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांना एक व्यापारी दुकान देऊन मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. सरकार जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अन्... मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी
करुणा मुंडेंची मोठी घोषणा, 'या' ठिकाणाहून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम

