Eknath Shinde : जय महाराष्ट्रानंतर… ‘जय गुजरात’ अन् शिंदे फसले? विरोधक तुटून पडल्यानंतर म्हणाले…
पुण्याच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा दिली आणि त्यानंतर आता शिंदेंवर विरोधक अक्षरशः तुटून पडलेत. आता शिंदेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंचा जय गुजरात म्हणणारा एक जुना व्हिडिओ समोर आणलाय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जय गुजरातची घोषणा पुण्यातली आहे. भाषण संपल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्रसह शिंदेंनी जय गुजरातचा नारा दिला. पुण्यात कार्यक्रम गुजराती समाजाचा होता. जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित होते. पण शहांचं कौतुक करत शेरोशायरी नंतर शिंदेंच्या तोंडी जय गुजरात आलं. विशेष म्हणजे जय हिंद आणि जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर काही सेकंद थांबून शिंदेंनी जय गुजरातची घोषणा दिली. आता जय गुजरात म्हटल्याने ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी शिंदेंवर तुटून पडली. आता ज्या कार्यक्रमात शिंदे जय गुजरात म्हणाले त्याच कार्यक्रमात दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा होते पण त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र अशीच घोषणा दिली. इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा टिकेची संधी साधली. शिंदेंना आता केम छो असं विचारायचं का असा टोला आव्हाडांनी लगावला. पण दरऱ्यांनीही आदित्य ठाकरेंनी लावलेल्या केम छो वरळी पोस्टरची आठवण करून दिली. बघा स्पेशल रिपोर्ट

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
