एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी

| Updated on: Oct 17, 2026 | 12:27 PM

शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही अकार्यक्षम मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. लवकरच त्यांना डच्चू दिला जाईल, तर तरुण आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी पदोन्नती दिली जाईल. दसरा मेळाव्यानंतर या घडामोडींना सुरुवात होईल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच मोठे संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ स्तरावर फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेत सध्या असलेले काही मंत्री त्यांच्या कार्यक्षमतेवर खरे उतरले नाहीत. अकार्यक्षम मंत्र्यांच्या कामगिरीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून, त्यांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर काही मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. या बदलांमध्ये तरुण आणि कार्यक्षम आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, सध्या राज्यमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या काही मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती दिली जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

विशेषतः दसरा मेळाव्यानंतर या सर्व घडामोडींना वेग येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेत नवचैतन्य आणण्याच्या आणि युवा नेत्यांना संधी देण्याच्या उद्देशाने हे फेरबदल केले जात असल्याचे बोलले जात आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ जवळ आल्याने कामगिरीचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरले आहे.

Published on: Oct 17, 2026 12:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us