AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : शिंदेंच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता? नाशिकमधल्या तुफान राड्याचा VIDEO व्हायरल

Nashik : शिंदेंच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता? नाशिकमधल्या तुफान राड्याचा VIDEO व्हायरल

| Updated on: Aug 11, 2025 | 5:06 PM
Share

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची नाशिक येथे एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. ही बैठक आगामी महापालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत तुफा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीतच दोन गट आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन गट आपापसात भिडल्याने गोंधळ उडाला. या राड्यादरम्यान दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी  एकमेकांची कॉलर पकडली इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली. पोलिसांसह उपस्थित सुरक्षा रक्षकांनी या दोन्ही गटातील भांडण सोडवलं.

नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन येथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे हॉटेलमध्ये उपस्थित होते. या बैठकीतच हा राडा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी या बैठकीत शिरल्याचा आरोप ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

Published on: Aug 11, 2025 05:06 PM