Gulabrao Patil : उठ भक्ता…1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणारे… गुलाबराव पाटलांच्या त्या विधानानं चर्चांना उधाण
'मागच्यावेळी मतदान होतं 21 तारखेला मतदान होतं आमदारकीचं...18 तारखेला लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली...उठ भक्त काय झोपलाय उठ मी आलीय तुला प्रसन्न व्हायला... बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही, 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे, उठ भक्ता काय झोपलाय उठ'
सध्या स्थानिक निवडणुकांसाठी राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात राजकीय नेते मंडळींकडून जोरदार प्रचार होताना दिसतोय. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. “आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे,” असे ते म्हणाले. तसेच, “एक तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे,” असेही गुलाबराव पाटील यांनी मिश्कीलपणे म्हटले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याने सर्वाधिक लक्ष वेधले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी नारायण राणे कोंबडी विकायचे आणि भुजबळ महात्मा फुले सब्जी मंडीवर भाजी विकायचे अशा प्रकारची विधाने करून अनेकांना बाळासाहेबांनी मोठे केले असे म्हटले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

