Santosh Bangar : ‘मोदी, फक्त 1 तास सवलत द्या अन्…’, पहलगाम हल्ल्यावर बोलताना संतोष बांगर भडकले अन् जीभही घसरली
गेल्या दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 25 हून अधिकांचा बळी गेला. या भ्याड हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेल्यानंतर शिवसेना संतोष बांगर हल्ल्यावर बोलताना चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेल्याने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आमदार संतोष बांगर यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी संतोष बांगर यांनी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी संतोष बांगर यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ‘येणाऱ्या काही दिवसात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे काश्मीरमध्ये जाऊन जशास तसं उत्तर देतील. काश्मीरमध्ये जे आपलेच XXX दहशतवादी आहेत त्यांना भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करतील’, अशा विश्वास व्यक्त करत असताना संतोष बांगर यांनी संताप व्यक्त केला. पुढे बोलताना संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकच मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका तासाची सवलत द्यावी, पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ असं संतोष बांगर म्हणाले. तर पाकिस्तानबद्दल बोलताना आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

