Shahajibapu Patil : ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी ‘धृतराष्ट्र’नं उत्तर देत लगावला टोला, म्हणाले…
'डॉक्टर केळकर हे डॉक्टर आहेत. जगाच्या तंत्रज्ञानातून ते मानवांचा उपचार करत आहेत. 3000 वर्षांपूर्वीच्या राहू केतूच्या काळात त्यांनी जाऊ नये', असा सल्ला माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केळकर डॉक्टरांना दिला. ते पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणावर बोलत होते.
महाभारतात संजय श्रीकृष्णाच्या जवळ बसलेला नव्हता तर अंधळ्या धृतराष्ट्राच्या बाजूला बसलेला होता. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंना धृतराष्ट्र आहे असं म्हणायचं होतं, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. इतकंच नाहीतर संजय राऊत यांना पुन्हा एकदा महाभारत वाचण्याचा सल्ला शहाजी बापू पाटील यांनी दिला आहे. ‘संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावे महाभारतातील संजय हा श्रीकृष्ण जवळ बसलेला नव्हता तर अंधळ्या ध्रुत राष्ट्राजवळ बसलेला होता. त्यामुळे संजय राऊताला उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असे म्हणायचे होते त्यामुळे संजय राऊताने इतिहासाचा नीट अभ्यास करून बोलावे’, असा टोला शहाजीबापू पाटील यांनी राऊतांना लगावलाय. पुढे ते असेही म्हणाले, ‘विष्णू आणि कृष्णाच्या अवतारातच संजय राऊत का गुताय लागलाय मला कळना झाले. ट्रम्प, मोदी, चीन, जपान याचं कशाला बोलायला लागलाय. गेल्या दहा वर्षात मोदींनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली त्यामुळे शेअर बाजार हा इतर देशाच्या तुलनेत सगळ्यात कमी कोसळला. मोदींवर टीका करून स्वतःला महत्त्व प्राप्त करून घेऊ नका आधी वार्डात निवडून यायचं बघा’, अशी टीका संजय राऊत यांच्यावर शहाजी बापू पाटील यांनी केली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

