संजय राऊत यांनी तब्येतीची काळजी घ्यावी कारण…, श्रीकांत शिंदे यांच्यावरील कथित आरोपानंतर ते नेमकं काय म्हणाले?
VIDEO | संजय राऊत यांना सिझोफ्रेनिया सारखा आजार? डॉक्टर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी काय केली राऊत यांच्यावर खोचक टीका
अंबरनाथ, ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला होईल, अशी भीती गेल्या दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. अधिक गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा हास्यास्पद प्रकार आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांच्या आरोपावर पुराव्यासकट उत्तर दिले आहेत. चिंदरकर यांचाही जबाब पोलिसांनी घेतला. एक दिवस आधी राऊत म्हणाले जीवे मारायची सुपारी दिली. नंतर म्हणताय पोलिसांत सांगितले मला काळे फासणार, धक्काबुक्की करणार आहेत, असे ते म्हणाले. तर चिंदरकर यांनी हे सांगितल्याचं म्हणाल्यामुळे त्यांचा जबाब पोलिसांनी घेतला तेव्हा ते म्हणाले की मी कुणाचं नाव घेतलं नाही. त्यामुळे दोन्ही जबाबात विरोधाभास आहे, असे म्हणत ते म्हणाले मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती असल्याचा खोचक टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

