Monsoon Update | एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची चिंता वाढली
राज्यात मान्सूनच्या प्रगतीला सध्या मंदी आली असून त्यामागे एल निनोचा प्रभाव कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. एल निनो सक्रिय झाल्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या हालचालींवर परिणाम झाला असून, मान्सूनला तात्पुरता ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात मान्सूनच्या प्रगतीला सध्या मंदी आली असून त्यामागे एल निनोचा प्रभाव कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. एल निनो सक्रिय झाल्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या हालचालींवर परिणाम झाला असून, मान्सूनला तात्पुरता ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाची ओढ कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः आगामी आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.
तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग सध्या कमी झाला आहे. तसेच जागतिक हवामान बदलाचा परिणामही मान्सूनच्या प्रगतीवर होत असून, त्यामुळे पावसाची वाटचाल अपेक्षेपेक्षा मंदावली आहे.
दरम्यान, कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पावसाची परिस्थिती स्थिर होईपर्यंत पेरणीची घाई करू नये आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची पुढील कामे करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Jun 13, 2026 03:54 PM
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेटपार्टवरील विधान भोवलं... डॉक्टरवर
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!

